जळगाव, प्रतिनिधी | शहरातील जुन्या भागात असलेल्या स्वातंत्र्य सैनिक ज.सु. खडके विद्यालयाने आषाढी एकादशीनिमित्त काढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या दिंडीत शहरातील ‘आयवा’ गृपतर्फे बाल विद्यार्थी आणि शिक्षकांना लस्सीचे वाटप करण्यात आले.
या विद्यालयातर्फे गेल्या सुमारे २५ वर्षांपासून आषाढीला दिंडी काढण्याची परंपरा जोपासली असून त्या माध्यमातून समाज प्रबोधानासह वैष्णव संप्रदायाची परंपरा नव्या पिढीत रुजवण्याचे काम केले जात आहे.
https://www.youtube.com/watch?v=-SrHSQgfaeI&feature=youtu.be