मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयातील माजी विद्यार्थी शिक्षक पालक समितीच्या वतीने ऑनलाईन माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्याचे उद्घाटन मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा अॅड. रोहिणीताई खडसे- खेवलकर यांच्या हस्ते संपन्न झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. हेमंत महाजन उपस्थित होते. तसेच या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल पाटील उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी अॅड. रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी खडसे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात स्वतःचे प्रसंगी महाविद्यालयाचे नाव उज्वल करावे असे आवाहन करून शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.पाटील यांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थी हा महाविद्यालयाचा आरसा असतो, विद्यार्थ्यामध्ये महाविद्यालयाचे प्रतिबिंब प्रतिबिंबित होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मिळालेल्या ज्ञानाच्या शिदोरीतून स्व-विकास आणि जन-विकास साधला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
तसेच याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या नियोजनात आणि विकासात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य महाजन यांनी शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक बदल करण्याचे साधन असून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचा पाया रचला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुटुंब समाज आणि राष्ट्र प्रगतीत आपले नाव अधोरेखित केले पाहिजे पर्यायाने महाविद्यालयाचे नाव अधोरेखित होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
या ऑनलाईन मेळाव्याप्रसंगी उत्कर्षा पाटील, अजय खैरनार, कल्पेश बेलदार, प्रफुल खाचणे, समाधान काळे व अश्विनी राणे इत्यादी माजी विद्यार्थिनी आपले मनोगत व्यक्त करून महाविद्यालयाच्या नियोजनात आणि विकासात आम्ही सक्रिय सहभाग नोंदवू असे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाच्या संयोजना मध्ये माजी विद्यार्थी शिक्षक पालक समितीचे अध्यक्ष भूगोल विभाग प्रमुख प्रा. पी. पी. लढे, रसायन शास्त्राचे विभाग प्रमुख प्रा. डॉ.सी एए. नेहेते, गणित विभाग प्रमुख प्रा. एस. एम. पाटील, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. जी.एस.चव्हाण, कॉम्प्युटर विभागाचे प्रा. व्ही.पी.महाजन भूगोल विभागातील प्रा. विजय डांगे व डॉ. अतुल बढे, कॉमर्स विभागातील प्रा. एस.एल. खडसे आणि रसायन शास्त्र विभागातील प्रा.अमोल ढाके यांनी जबाबदारी पूर्ण केली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉमर्स विभागातील एस. एल.खडसे यांनी तसेच सूत्रसंचालन भूगोल विभागातील प्रा. विजय डांगे तर आभार प्रदर्शन रसायनशास्त्र विभागातील प्रा.अमोल ढाके यांनी केले. या ऑनलाइन मेळाव्याला महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी वर्ग आणि आजी-माजी विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने ऑनलाइन उपस्थित होता.