जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील केसीईचे आयएमआरमध्ये दहीहंडी आणि गोपालकाला स्पर्धा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे अनेक सणांवर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, यावर्षीचे सण हे निर्बंधमुक्त असणार असे जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. हि पार्श्वभूमी लक्षात घेऊन केसीईचे आयएमआरमध्ये डायरेक्टर प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक टिम कामाला लागली. दहीहंडी महोत्सव आणि स्पर्धांचे नियोजन करण्यात आले.
पहिल्या मजल्यावर टांगलेल्या या दहिहंडीला आयएमआरच्या श्रीकृष्णांनी आपल्या वर्गमित्रांना घेऊन त्या मडक्याचा आंदाज आधी घेतला. यात मुलींच्या टिम पण सहभागी होत्या.
एकुण आठ टिमने या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला. त्यात राधे राधे प्रथम, गोकुळ सेना द्वितीय, या विद्यार्थ्यांच्या टिम आणि विद्यार्थिनींची टिम गोकुळच्या गोपी या विजेत्या ठरल्या. ऋषीकेश देशमुख, भटू अग्रवाल, संस्कृती नेवे, मेघना भोळे, हे विद्यार्थी समन्वयक होते.
भुमी शहा, पुर्वा बडगुजर, कल्याणी निकुंभ, अभिश्री चव्हाण, लेखा येवले सयाजी जाधव, सौरभ महाजन, कुणाल पाटिल, लोमेश येवले, प्रविण पाटिल, अजय मळी, या टिम लिडर सह एकुण 180 मुलेमुली या स्पर्धेत सहभागी झालीत. त्यानिमित्ताने आयएमआरमध्ये गोपालकाला देखिल तयार करण्यात आला होता.
श्रीकुष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा हा उत्सव म्हणजे दही हंडी. कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा टीव्ही टीव्ही पोहचण्यात यशस्वी होत असे. यासाठी त्याचे, मित्र त्याला मदत करत असत. या घटनेची त्याची गोड आठवण करुन देणारा हा उत्सव.
या संपूर्ण उपक्रमासाठी उपक्रम समन्वयक निलीमा पाटील, संदिप घोडके, प्रकाश बारी, मानसी भंगाळे, हरप्रित सैनी, नेहा ललवाणी, योगेश्वरी यावलकर, यांनी परीश्रम घेतलेत.