‘केसांवर फुगे’ गाण्याची धूम : दीड महिन्यात तीन कोटी व्ह्यूज

hqdefault 1

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील वाकी येथील प्रसिद्ध गायक तथा गीतकार आण्णा सुरवाडे, शेंदुर्णी येथील प्रसिध्द संगीतकार तथा अभिनेता सचिन कुमावत यांच्या ‘केसांवर फुगे’ या अहिराणी गाण्याला केवळ दीड महिन्यात तीन कोटीच्यावर व्ह्यूज मिळाले असून संपूर्ण महाराष्ट्रात या गाण्याने धम्माल केली आहे.

 

युट्यूब चॅनेल, हाँट्स अॅप, टिकटाँकसह इतर चॅनलवरही त्याची धूम सुरु आहे. पहिल्यांदाच खान्देशातील अहिराणी गाण्याला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रात मिळत आहे. या टिमने या अगोदरही अनेक धम्माल गाणी केली असून रसिकांचा त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. रसिक मनाचा अचुक अंदाज घेऊन आगळे-वेगळे गाणे या जोडीने बनवले आहे. अजून अशी अनेक आगळी-वेगळी गाणी त्यांच्याकडून रसिकांच्या भेटीला येणार आहेत. भविष्यात येणाऱ्या सर्वात वेगळ्या व हटके गाण्यांना रसिकांनी दिल खोलके प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा या टिमकडुन व्यक्त होत आहे. आपण रसिकांच्या नेहमीच ऋणात राहू, असे त्यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलताना सांगितले.

Add Comment

Protected Content