भोपाळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मध्य प्रदेशातून भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांची मंगळवारी राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. आपल्या निवडीबद्दल कुरियन म्हणाले की, केरळ आणि मध्य प्रदेशचे नाते अधिक घट्ट झाले आहे. केंद्र सरकारमधील मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन-दुग्धव्यवसाय आणि अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांची मध्य प्रदेशातून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. राज्यसभेवर निवडून आल्यावर जॉर्ज कुरियन यांनी भाजपचे सर्वोच्च नेतृत्व आणि मुख्यमंत्री मोहन यादव यांचे आभार मानले.
मध्य प्रदेशातून राज्यसभेवर निवडून आल्यावर जॉर्ज कुरियन यांनी भारतीय जनता पक्ष आणि मध्य प्रदेशातील जनतेचे आभार मानले आणि सांगितले की, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केरळमधील वायनाड येथील भूस्खलनातून सावरण्यासाठी 20 कोटी रुपयांची मदत दिली. यामुळे मध्य प्रदेश आणि केरळमधील संबंध आणखी दृढ झाले. जॉर्ज कुरियन यांची मध्य प्रदेशातून राज्यसभेवर निवड होणे ही प्रत्येकासाठी भाग्याची बाब असल्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितले.