रेल्वे अपघातात केरळच्या महिलेचा बांभोरीजवळ मृत्यू

deathbody 180511

 

जळगाव (प्रतिनिधी) आपल्या पतीसह रायपूर येथून राजकोट येथे जात असताना केरळ राज्यातील एका महिलेचा रेल्वेतून खाली पडल्याने जळगाव-पाळधी दरम्यान बांभोरी गावाजवळ मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री घडलीय. याबाबत ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सनिश कृष्णनकृती (वय 30) आणि त्यांची पत्नी सूर्या सनिस कृष्णनकृती (वय 27 रा. नांगीयार कुरणंलरा पो. पेल्लीमनुर ता. पोट्टलयम जि. आलपी (केरळ)) हे दोघे रायपूर छत्तीसगड येथे आयुर्वेदिक दुकानावर दोन महिन्यांपासून काम करत होते. पुढे त्यांना जास्त पगाराची नोकरी गुजरात राज्यातील राजकोट येथे लागली होती. त्यामुळे त्यांनी रायपूर येथे आपल्या कामाचा राजीनामा देऊन दोघे पती-पत्नी रेल्वेने राजकोट येथे होते. आज मध्यरात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास जळगाव-पाळधी दरम्यान बांभोरी गावाजवळ सूर्या या महिलेचा रेल्वे दरवाजाजवळ उभे असतांना अचानक तोल जात त्या रेल्वेतून खाली पडल्या. आपली पत्नी खाली पडल्याचे लक्षात आल्यानंतर सनीशने रेल्वेची चैन ओढून रेल्वे थांबवली. झालेला प्रकार रेल्वे कर्मचाऱ्यांना सांगितल्यानंतर तत्काळ रेल्वे थांबविण्यात आली. तसेच पाळधी येथील रेल्वे कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाजूला करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.

 

दरम्यान ही दुर्देवी घटना आहे की नाही? याची चाचपणी होण्यासाठी महिलेचे बाहेरील व सासरकडील मंडळी आज सायंकाळपर्यंत जळगावात दाखल होणार आहे. या घटनेबाबत ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगावात राहणारे केरळ राज्यातील नागरिकांनी कोणताही विलंब न करता जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन सहकार्य करण्याचे काम सुरू केले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी मुंबईहून नातेवाईक येत असल्याचे सांगण्यात आलेले आहे.

Add Comment

Protected Content