जळगाव प्रतिनिधी । शहरातील केसीईच्या आयएमआर महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ‘डिजिटल युगातले कम्यूनिकेशन स्किल’ विषयावर बेबिनार आज २६ मार्च रोजी घेण्यात आले. यावेळी १५० विद्यार्थ्यांनी बेबिनारमध्ये सहभाग नोंदविला होता.
कार्यक्रमाची प्रस्तावना देतांना आयएमआरच्या प्राचार्या प्रा.डॉ. शिल्पा बेंडाळे म्हणाल्यात अधुनिक जगात आपण वेगवेगळ्या स्तरावर यशस्वी संवाद साधत असतो. त्याचा यशस्वी प्रयोग म्हणुन उपयोग करता आला पाहिजे. असे सांगितले. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, पारंपारिक आणि डिजिटलमध्ये संप्रेषणाची तत्त्वे काही सारखी तर काही वेगळी असतात. जसे की बोलण्यात स्पष्टता, बोलण्याकडे आणि ऐकण्याकडे लक्ष, योग्य वेळी अभिप्राय, वेळेचे भान , सुसंगतता, पर्याप्तता यासारख्या गोष्टींचा विचार आवश्यक असतो. डिजिटल संप्रेषणामध्ये कनेक्टिव्हिटी हि आवश्यक गोष्ट आहे.
विवीध देशांमधील वेळेचा फरक लक्षात ठेवला पाहिजे, मिटींगमधील प्रवेश-योग्यता लक्षात घेतली जाते , भावनिक कनेक्ट, ओळख, विश्वासार्हता, हे ऑनलाईन भाषणात पण जपता येतात भाषा संबंधित विविध अडथळे, जसे की औपचारिक संप्रेषणात अती संक्षिप्त संभाषण होते काही वेळा ते टाळले गेले पाहिजे. नीट लक्ष पुर्वक ऐका, योग्य दृष्टीकोनातून समजून घ्या, मूल्य, शिष्टाचार जपा, ह्या लहान आणि सोपे गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे , मिटींग आधी मसुदा तयार करणे, तालीम करणे आणि तो लागू करणे हे महत्त्वाचे ठरते. या कार्यक्रमासाठी सुत्रसंचलन आणि आभार बरखा मखिजा यांनी मानले.