विद्यापीठाने जाहीर केल्या परीक्षांच्या संभाव्य तारखा

जळगाव, प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मधील उन्हाळी सत्रातील अभ्यासक्रम निहाय Online पध्दतीने परीक्षा सुरू होण्याच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 

Online पध्दतीने  सुरु होणाऱ्या परीक्षांचा संभाव्य तारखा पुढील प्रमाणे ८ जून, २०२१ पासून बी.एस.डब्ल्यू. (सत्र १,३,४,५ व ६), बी.ए. बी.सी.जे. (सत्र १,३,४,५ व ६), बी.पी.ई. (सर्व सत्र), बी.एफ.ए. (वार्षिक), डी.पी.ए. (सत्र १,३,४), बी.ए. ॲडीशनल संगीत (वार्षिक), लॉ. (सत्र १, नियमित व पुर्नपरीक्षार्थी सत्र १) या परीक्षा होतील. तर १५ जून, २०२१ पासून बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. (सत्र १,३,४,५ व ६) या अभ्यासक्रमाच्या परीक्षा होतील. २५ जून, २०२१ पासून पदव्युत्तर म्हणजे एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी., एम.एस.डब्ल्यू. (सत्र १,३ व ४) तसेच पदवी मॅनेजमेंट (सत्र १,३,४,५ व ६) आणि शिक्षणशास्त्र (द्वितीय वर्ष) या परीक्षा होणार आहेत. दि. २९ जून २०२१ पासून पदव्युत्तर मॅनेजमेंट (सत्र १,३ व ४) च्या परीक्षा होतील. १ जुलै २०२१ पासून बी.व्होक. (सत्र १,३,४,५ व ६), डीप्लोमा / सर्टीफिकेट कोर्से (वार्षिक) परीक्षा होणार आहेत. तर जनरल नॉलेजची परीक्षा ही ५ जुलै, २०२१ ला होईल.

या सर्व परीक्षांच्या सराव परीक्षा (Mock Test) होणार असून परीक्षेच्या तारखेपूर्वी या सराव परीक्षा होतील. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर या सराव परीक्षा उपलब्ध राहतील. या संदर्भात त्या त्या अभ्यासक्रमाच्या टेलीग्राम ग्रुपवर तसेच परीक्षा समन्वयक यांच्या ग्रुपवर अवगत केले जाईल. विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा देणे आवश्यक आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक बी.पी.पाटील यांनी दिली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील प्रथमवर्ष पदवी व पदव्युत्तर वर्गाच्या द्वितीय सत्राच्या उन्हाळी प्रात्यक्षिक व लेखी परीक्षांच्या संभाव्य तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रथम वर्ष पदवी (विज्ञान) द्वितीय सत्राच्या प्रात्यक्षिक परीक्षा ८ जुलै ते २० जुलै दरम्यान तर लेखी परीक्षा १ ऑगस्ट, २०२१ पासून सुरू होतील.  प्रथम वर्ष एम.एस्सी. द्वितीय सत्राच्या  प्रात्यक्षिक परीक्षा १० ऑगस्ट ते २० ऑगस्ट दरम्यान होतील. तर लेखी परीक्षा सुरु होण्याची संभाव्य तारीख २५ ऑगस्ट, २०२१ पासून असेल. प्रथम वर्ष पदवी कला, वाणिज्य व व्यवस्थापनच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे आयोजन महाविद्यालयाने निश्चित केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे लेखी परीक्षेपूर्वी केले जाईल. १ ऑगस्ट, २०२१ पासून लेखी परीक्षा संभाव्य आहेत.  प्रथम वर्ष पदव्युत्तर कला, वाणिज्य  व व्यवस्थापनच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे आयोजन महाविद्यालयाने निश्चित  केलेल्या  वेळापत्रकाप्रमाणे  लेखी परीक्षेपूर्वी केले जाईल.  लेखी  परीक्षा सुरु  होण्याची  संभाव्य तारीख २५ ऑगस्ट २०२१ असेल याशिवाय प्रथम वर्ष एम.बी.ए. (सत्र २) च्या प्रात्यक्षिक परीक्षांचे आयोजन महाविद्यालयाने निश्चित केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे लेखी परीक्षेपूर्वी केले जाईल. १५ सप्टेंबर, २०२१ लेखी परीक्षा सुरु होण्याची संभाव्य तारीख आहे. अशी ही माहिती  बी. पी. पाटील यांनी दिली.  

 

Protected Content