यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील महिलांनी कावड यात्रा काढून जलाभिषेक केला असून यात शेकडो भाविक सहभागी झाल्या होत्या.
जयावल शहरातील विविध क्षेत्रातील राहणार्या भाविक महिलांनी जिवनातील कष्ट दूर व्हावीत संपुर्ण सृष्टीवर शांतता नांदावी आपल्या ईच्छा,आकांक्षा पुर्ण व्हाव्यात म्हणुन अधिक श्रावण अमावस्या समाप्तीच्या निमित्ताने काढली उत्साहाच्या व भक्तीमय वातावरणात कावड यात्रा काढण्यात आली .
यावल नगरीतील महिलांनी शहरातील फैजपुर मार्गा वरील असलेल्या श्री मनुदेवी मंदीर परिसरातुन कावड यात्रेची सुरूवात केली. यानंतर विविध शिव मंदिरांमध्ये जाऊन जलाभिषेक करण्यात आला. कावड यात्रेच्या माध्यमातून शिवालयात जाऊन जलाभिषेक केल्यास मोक्ष प्राप्त होतो,आपल्या जीवनात कष्ट न राहता सुखाची प्राप्ती होते. घरात धन-धान्याची कमतरता राहत नाही,आपल्या सर्व इच्छा आणी आकांक्षा पूर्ण होतात,संपूर्ण सृष्टीवर शांतता नांदावी व सर्व प्राणीमात्रांचे कल्याण होतेअसे सांगितले आहे.
या अनुषंगाने शहरातील महिला भाविकांनी कावड यात्रा काढुन यावल शहरातील महादेवाचा जयघोष करत पवित्र नद्यांचे पाणी आणून शिवालयाचे जलाभिषेक करण्यात आला.
या कावड यात्रेमध्ये मनीषा कुयटे,लता सोळुंके,भावना चौधरी,संगीता महाजन भारती चौधरी,प्रमिला सूर्यवंशी,प्रतिभा ठाकरे,चंद्रभागा बोरसे,कल्पना मंदवाडे,मनीषा कोळी आशा सुतार, मंगला सैंदाणे,सुरेखा कोळी,रेखा खर्चे,कविता गोसावी, कल्पना मंदवाडे आदींसह अन्य महिलांनी सहभाग घेतला.