जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । निर्दयतेने वाहनात कोंबून कत्तलीसाठी नेणाऱ्या दोन गुरांची वाहतूक करतांना पिंप्राळा येथील सोमाणी मार्केट येथे सुटका करण्यात आली आहे. पोलीसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील पिंप्राळा भागातील सोमाणी मार्केट जवळून दोन गुरांना वाहनात निर्दयतेने कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याची गोपनिय माहिती रामानंदनगर पोलीसांना मिळाला. त्यानुसार पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या सुचनेनुसार पोलीसांनी मंगळवारी ५ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास सोमाणी मार्केटजवळ येवून वाहनाची तपासणी केली असता २६ हजार रूपये किंमतीच्या दोन गुरांना कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याचे निष्पन्न झाले. प्रकारणात संजय माणिक धनगर (वय-४४) रा. मालोद ता. यावल आणि परशूराम पंडीत पाटील (वय-३३) रा. किनगाव ता. यावल यांना संशयित म्हणून ताब्यात घेतले असून दोन्ही गुरांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता पोलीस कर्मचारी सागरकुमार देवरे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी संजय माणिक धनगर (वय-४४) रा. मालोद ता. यावल आणि परशूराम पंडीत पाटील (वय-३३) रा. किनगाव ता. यावल यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजेश चव्हाण करीत आहे.