कासोदा, ता. एरंडोल प्रतिनिधी । येथील ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक तीनमध्ये घाणीचे साम्राज्य असल्याने ग्रामस्थांना जगणे मुश्कील झाले आहे.
याबाबत वृत्त असे की, ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक तीन मधील सदस्यांच्या दुर्लक्षामुळे शिंपी गल्ली परिसरातील गटारी तुडुंब भरलेल्या आहेत. यातच या गटारींमध्ये बिस्लेरी च्या खाली बॉटल्स, प्लास्टिकच्या कॅरिबॅग्ज, कागद आदी भरलेले असल्याने तेथील गल्लीचे नळ आल्यावर रस्त्यावर पाणी उतरते त्या पाण्यात रस्ता आहे की नाला हे देखील कळत नाही. या वॉर्डातच व्यापारी गल्ली असुन त्या गल्लीत गावातील सर्वात मोठे कैलास मेडिकल , कापड दुकाने , दवाखाने, सराफांचे दुकानं, किराणा दुकाने ,असुन येथील ग्रामस्थांचे हाल होत आहे. यामुळे येथील समस्येकडे कोण लक्ष देणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी असून देखिल गटारी साफ केल्या जात नाहीत,साफ केल्यातर घाण १५-१५ दिवस उचलली जात नाहीत. या या भागातील ग्रामस्थांचे जगणे अक्षरश: मुश्कील झालेले आहे. ग्रामपंचायत प्रशासन आणि पदाधिकार्यांनी याची दखल घेऊन या भागात नियमितपणे स्वच्छता राखावी अशी मागणी होत आहे.