कासोदा प्रतिनिधी । येथील जिल्हा बँकेच्या शाखेत दोन कर्मचारी असल्याने खातेदारांना तासंतास पैश्यांची देवाण व घेवाणसाठी रांगेत उभे रहावे लागते. या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी परीसरातील खातेदारांकडून होत आहे.
शहरात जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे. शाखेला आजूबाजूच्या परिसरातील १० ते १२ खेडे गाव जोडले गेले आहे. या शाखेत बँकेत १३ हजाराहून अधिक खाती असून दोनच कर्मचाऱ्यांवर ही बँक चालू आहे. नोटबंदी प्रमाणे कासोदा येथील जिल्हा बँकेत खातेदार सकाळी १० वाजेपासूनच रांगेत उभे राहतात. दोनच कर्मचारी एवढ्या मोठ्या शाखेत कार्यरत असल्याने सर्व व्यवहारांवर विलंब होत आहे. दरोराज कटकट व भांडण या परिसरात ऐकायला मिळत आहे एकही दिवस भांडण झाल्या शिवाय जात नाही.
कासोद्यासह सर्व खेड्यातील ग्रामपंचायती, पतसंस्था, सहकारी दूध संस्था, किसन सन्मान योजना, दुष्काळ निधी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक सरकारी नोकरदार यांचे देखील पगार ह्याच बँकेत होत असतात म्हणून दोनच कर्मचारी असल्याने येथे ग्राहकांची तारांबळ उडते, येथे व्यवस्थापक, एक लिपिक एवढी मोठी बँकेसह खातेदारांना ही सांभाळतात शिपाई व शाखा उपव्यवस्थापक अशी पदे रिक्त आहे, तरी प्रशासनाने व जिल्हा बँकेने कर्मचारी वाढवून द्यावे अशी मागणी येथे होत आहे.