Home Cities एरंडोल कासोदा येथे मुस्लिम कब्रस्तानात स्वच्छता अभियान

कासोदा येथे मुस्लिम कब्रस्तानात स्वच्छता अभियान

0
69


कासोदा प्रतिनिधी | डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या जळगाव शाखेतर्फे आज सकाळी ७ ते १० या वेळेत येथील मुस्लिम समाज कब्रस्तानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

५९४८ चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या कब्रस्तानात एकुण १०० श्री सदस्यांनी सुमारे सात टन कचऱ्याची विल्हेवाट लावून कब्रस्तानाची स्वच्छता केली. यावेळी येथील मुस्लीम पंचमंडळातर्फे महेमील खान युसूफ खान, मुश्ताक शेख मुनाफ शेख, शेख भिकन शेख इब्राहिम, मुश्ताक खान खुडियार खान, इश्ताक खान युसूफ, अशरफ अली अकबर अली आदी उपस्थित होते. येथील ग्रामपंचायतीतर्फे ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound