जम्मू (वृत्तसंस्था) काश्मीरमध्ये एका घरात लपून बसलेल्या सहा दहशतवाद्यांना सुरक्षादलांनी चकमकीत ठार केले आहे. दरम्यान, या चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद झाला तर 2 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
रामबन जिल्ह्यातल्या एका गावात दहशतवाद्यांशी चकमक झाल्यानंतर त्यांनी हायवेलगतच्या एका घरात आसरा घेतला. या दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले. या दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठीचे ऑपरेशन तब्बल 9 तास चालले. लष्कराच्या एका पथकावर अतिरेकी हल्ला झाल्यानंतर काश्मीरच्या या भागात मोठी शोधमोहीम राबवण्यात आली. यामध्ये कोंडीत सापडलेल्या अतिरेक्यांना सुरक्षा दलांनी वेढा घातला. हे अतिरेकी किश्तवार भागातून आले असावेत, असा अंदाज आहे.