कर्नाटक (वृत्तसंस्था) बंडखोर आमदारांवरील कारवाईनंतर हायकोर्टाच्या आदेशाने १५ मतदारसंघात नुकत्याच पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरु झाली होती. आतापर्यंत निकालाच कल स्पष्ट आला आहे. यानुसार भाजपने १० जागांवर आघाडी घेतली आहे. यानिमित्ताने येडीयुरप्पा सरकारवरील धोका देखील टळला आहे. दरम्यान, काँग्रेसने आपला पराभव स्विकारला आहे.
२२४ सदस्यसंख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेच संख्याबळ १७ आमदारांच्या बडतर्फीनंतर २०८ वर आले होते. त्यानंतर येडियुरप्पा यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला होता. सध्या भाजपाचे १०५ आमदार असून, सत्तेवर विराजमान राहण्यासाठी त्यांना ६ आमदारांचे संख्याबळ आवश्यक होते. त्यानुसार आता त्यांच्याकडे बहुमत आल्याचे स्पष्ट आहे. दरम्यान, कर्नाटक काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांनी म्हटले की, या १५ मतदारसंघातील जनादेश आम्हाला मान्य आहे. लोकांनी दलबदलूंना स्विकारले आहे. त्यामुळे आम्ही पराभव स्विकारला आहे. या पराभवामुळे आम्ही निराश होणार नाहीत.