Home क्राईम कन्नड घाटात लागलेल्या आगीत वनकर्मचारी जखमी

कन्नड घाटात लागलेल्या आगीत वनकर्मचारी जखमी


chalisgaon ghar

चाळीसगाव प्रतिनिधी । काल लागलेली कन्नड घाटातली आग अजूनही विझलेली नाही, सकाळी आग विझवत असताना वनकर्मचारी ओंकार राठोड यांच्या अंगावर वरून दगड पडल्याने ते जखमी झालेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना बोलवण्यात आले.

 

म्हसोबा मंदिराच्या वरच्या बाजूने काल दुपारी डोंगर माथ्यावर लागलेली आग आज सकाळपर्यंत रोड ओलांडुन खालच्या बाजूस सुरू झाल्याने वनविभागाची खूपच तारांबळ उडालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अग्निशमन बंब आणि आज आग विझविण्यास मदत होईल असे तेथील एकाने सांगितले वरिष्ठ स्तरावर आग विजवण्यासाठी कोणी लक्ष देईल का?असे बोलले जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound