कंगना खोटारडी आहे – उर्मिला मातोंडकर

 

मुंबई :  कंगना  खोटारडी आहे. खूप जास्त प्रमाणात खोटं बोललं की लक्षात रहात नाही. कंगनाचं तसंच झालंय. ती आत्ता एक बोलते आहे आणि याआधी बरंच बोलून गेली आहे. जे तिच्या लक्षात नाही असं  मत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मांडलं आहे.

एबीपी माझा या वृत्त वाहिनीच्या माझा कट्टा या कार्यक्रमात अभिनेत्री उर्मिला मांतोडकर यांनी कंगना रनौतला बॉलिवूडवर केलेल्या आरोपांबाबत सडेतोड उत्तर दिलं आहे. कंगनाचे बॉलिवूडमध्ये ज्या काही लोकांशी वाईट संबंध आहेत, ते चार-दहा लोक म्हणजे बॉलिवूड नाही. बॉलिवूड खुप मोठी, सतत मेहनत करणारी इंडस्ट्री आहे. मात्र फक्त काही लोकांमुळे संपूर्ण बॉलिवूडला बदनाम करणे अत्यंत आक्षेपार्ह आणि निंदनीय आहे. ज्या इंडस्ट्रीने तुम्हाला घडवलं, त्याबद्दल असं बोलणे चुकीचं आहे, असं उर्मिला मांतोडकर यांनी म्हटलं. एबीपी माझाच्या माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

बॉलिवूडमधील नेपोटिझमबाबत बोलताना उर्मिला यांनी म्हटलं की, बॉलिवूडमध्ये नेपोटिझम नाही असं मी बोलणार नाही. मी देखील बॉलिवूडमध्ये नेपोटिझमचे परिणाम भोगावा लागला. त्या काळात माझ्यावर अनेक प्रकारे टीका करण्यात आली. त्यात मराठी असल्यानेही अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या. विविध प्रकारच्या भूमिका केल्या तरी माझी कधी स्तुती केली नाही गेली. मात्र बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी माझ्या कामाचं कौतुकही केलं.

कंगना सारखी भारतकन्या देशातील प्रत्येक भागात निर्माण झाली पाहिजे. ती केवळ मुंबईतच का आलीय? तिने आधी हिमाचल प्रदेशच्या लोकांकरीत काहीतरी करावं. मुंबईत कंगनाने सर्वकाही कमावलं. बॉलिवूडने कंगनाला भरभरुन दिलं, मात्र तरीही बॉलिवूडला नावं ठेवयची हे चुकीचं आहे, असं उर्मिला यांनी म्हटलं.

Protected Content