Home क्राईम कांचन नगरातून दुचाकीची चोरी; शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल

कांचन नगरातून दुचाकीची चोरी; शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल

0
108
two wheelar thift

 

 

जळगाव प्रतिनिधी । शहरातील कांचन नगरातून १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील कांचन नगरात राहणारे एकनाथ शंकर राजपूत (वय-४६) हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. बांधकामाच्या ठिकाणी हातमजूरीचे काम करतात. कामाला जाण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ एझेड २१७५) क्रमांकाची दुचाकी आहे. ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता ते कामावरून दुचाकीने घरी आले. दुचाकी घराच्या समोर पार्किंग करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. एकनाथ राजपूत यांनी परिसरात दुचाकीची शोधाशोध केली परंतू आढळून आली नाही. दुचाकी चोरला गेल्याप्रकरणी त्यांनी शनीपेठ पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय निकम करीत आहे.


Protected Content

Play sound