Home Cities यावल कामगिरीच्या बळावर दुर्गेशची राज्यस्तरावर झेप

कामगिरीच्या बळावर दुर्गेशची राज्यस्तरावर झेप

0
29
durgesh 11
durgesh 11

durgesh 11

यावल प्रतिनिधी । येथील रुद्रा बॉक्सींग क्लबच्या माध्यमातून रविवार (दि.१६ जुन) रोजी भुसावळ येथे झालेल्या ६ व्या ज्युनिअर महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०१९च्या प्रशिक्षण झाले आहे. यात दुर्गेश बडगुजर याने भुसावळमध्ये झालेल्या स्पर्धेत यश संपादन केले आहे.

याबाबत माहिती अशी की, भुसावळ येथे ६ व्या ज्युनिअर महाराष्ट्र बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०१९ या पार पडलेल्या स्पर्धेत दुर्गेश बडगुजर याने केलेल्या कामगिरीमुळे दुर्गेशची अकोला येथे 21 जून रोजी होणाऱ्या राज्य पातळीवरील बॉक्सींग स्पर्धेसाठी यावल तालूक्याच्या प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे. दुर्गेश यांच्या यशास रुद्रा बॉक्सींग क्लबचे प्रशिक्षक पंकज तडवी, हर्षल ठाकरे, गौरव मराठे तसेच भुसावळच्या कॅसिअस बॉक्सींग क्लबचे मुख्य प्रशिक्षक सुनिल नावगीरे व मध्य रेल्वेचे एनएस प्रशिक्षक चंनीलाल गुप्ता यांचे मोलाचे मार्गदर्शन त्याला लाभले आहे. तसेच, प्रशिक्षक मंडळीच्या मार्गदर्शनामुळे रुद्रा बॉक्सींग क्लबची स्थापना करण्यात आली. अशी माहिती प्रशिक्षक पंकज तडवी यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound