फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रोझोदा येथील कामसिद्ध मंदिराचे प्रांगणात भव्य दिव्य मोठया सभागृहाची उभारणी नुकतीच पूर्ण झाली असून या सभागृहाचा लोकार्पण सोहळा संत व मान्यवर लोकप्रतिनिधी यांच्याहस्ते संपन्न झाला.
विश्वस्थ मंडळाने परिश्रम घेऊन लोकवर्गणीतून निधी जमा करून या सभागृहाचे काम पूर्ण करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. या कार्याची दखल वै. डिंगम्बर महाराज चिनावलकर मठ संस्थेने घेतली असून या कार्याचा गौरव म्हणून विशवस्थ मंडळाचे अध्यक्ष विजय राघव, महाजन, रमेश रामचंद्र महाजन, टेनू फेगडे, गुणवन्त टोंगळे, डॉ. विजय धांडे, वसंत बॉंडे, अरुण बॉंडे, अभियंता भरत शशिकांत महाजन व सर्व मंडळ यांचा श्री महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज व हभप दुर्गादास महाराज नेहते, मठ संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे आमदार शिरीषदादा चौधरी, भक्तीकिशोर शास्त्री, उपाध्यक्ष घनश्याम पाटील, सचिव विठ्ठल भंगाळे यांचेहस्ते सन्मानपत्र व शाल व हार देऊन सन्मान करण्यात आला.
सन्मान पत्राचे वाचन प्रा.व.पु.होले यांनी केले. यावेळी म.स, का, चेअरमन शरद महाजन व ह.भ.प.धनराज महाराज, भरत महाराज म्हैसवाडीकर, शिरस्ता भन्तेजी पुरुषोत्तम धांडे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज, आमदार शिरीष चौधरी, गोपीबाबा पाल आश्रम, खासदार रक्षाताई खडसे, भक्तीकिशोर शास्त्री, मठसस्था अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी या कार्याबद्दल गौरवपूर्ण मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नंदकुमार सर सावदा यांनी केले तर आभार डॉ. विजय धांडे यांनी व्यक्त केले