धानोरा ता. चोपडा (वार्ताहार) । धानोरा येथून जवळ असलेल्या पंचक गावातील खळ्याला आज गुरूवारी दुपारी आचानक लागलेल्या आगीत 2 जनावरे दगावली तर चारा व शेतीची उपयोगी अवजारे जळू खाक झाल्याची घटना दुपारी 11.30 वाजेच्या सुमारास घडली असून नुकसानीचा पंचनामा करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, भालचंद्र ंरामरतन पाटील रा. पंचक ता. चोपडा यांच्या मालकीच्या खळ्याला आज दुपारी 11.30 वाजता अचानक लागलेल्या आगीत आगीत 1 गाय आणि वासरू यांचा जळून दगावली तर 2 म्हैस भाजले गेले आहे. सोबत जनवरांसाठी लागणार चारा चारा व शेती उपयोगी अवजारे असे एकुन अंदाजे 2 लाख 35 हजार रूपयाचे नुकसान झाले आहे. ही आग कोणत्या कारणामुळे लागली हे समजू शकले नाही. दरम्यान ही आग लागल्यानंतर गावातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यास मदत केली. तलाठी यांनी येवून या घटनेचा पंचनामा केला