Home Cities जळगाव कल्पना पाटील यांचा राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

कल्पना पाटील यांचा राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

0
51


जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे पाठविला आहे.

राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षपदी कल्पना शांताराम पाटील यांनी सुमारे तीन वर्षे काम केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आपल्या पदाचा राजीनामा देतील अशी चर्चा होती. या अनुषंगाने त्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे पाठविला आहे. 

आपण गत तीन वर्षात महिला आघाडीला बळकट करण्याचे काम केले असून आता नवीन तरूण चेहर्‍याला वाव मिळावा म्हणून आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे सौ. कल्पना पाटील यांनी राजीनाम्याच्या पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, आता या पदावर कुणाची नियुक्ती होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 


Protected Content

Play sound