एरंडोलजवळ भीषण अपघात ; चालकासह ६ प्रवाशी ठार

33efa5b2 38d2 47fa 877c a308a256a5ad

एरंडोल (प्रतिनिधी) येथून जळगावच्या दिशेने अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या एका हॉटेल जवळ प्रवाशी वाहतूक करणारी कालीपिली आणि ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात चालकासह ६ प्रवासी जागीच ठार झाले आहेत.

 

या संदर्भात अधिक असे की, याबाबत माहिती अशी की, एरंडोल शहरापासून सहा किलोमीटर असलेल्या हॉटेल गौरी जवळ धुळे कडून जळगावकडे जाणाऱ्या क्रमांक (एम एच 15 जी 8474) या गाडीचा एक्सेल तुटल्याने ट्रक चालकाचा नियंत्रण सुटले. यात जळगावकडून एरंडोलकडे जाणाऱ्या कालीपिली गाडी क्रमांक (एमएच 19 वाय 5207) या गाडीवर आदळली. काली पिली गाडीतील सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या प्रवाशांना एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

Protected Content