कालभैरवनाथ यात्रोत्सव : लाखो भक्तांची मांदियाळी

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील गोवर्धन मारवड बोरगाव सह परिसराचे आराद्य दैवत व भारतातील तीन स्वयंभू भैरवनाथनपैकी येथील एक असलेल्या श्री कालभैरव नाथांचा दोन दिवसीय यात्रोत्सव माळण नदीकाठी नुकताच साजरा झाला.

तालुक्यातीलच नव्हे तर राज्यातील अनेक ठिकाणचे भाविकांचे श्रद्धास्थान व परिसराचे आराद्य दैवत असलेल्या श्री कालभैरव नाथांचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून भाविकांनी एकच गर्दी केली होती. दिवसभरात जवळपास सुमारे दीड लाखांचा वर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.यावेळी येणाऱ्या भाविकांसाठी रात्री उशिरापर्यंत महाप्रसादाचे वाटप सुरू होते.तालुक्याचे आमदार अनिल पाटील माजी आ.स्मिता वाघ यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी देखिल दर्शनासाठी हजेरी लावली.गेल्या दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या प्रादुर्भाव मुळे यात्रा रद्द करण्यात आली होती. मागील वर्षांपासून हा यात्रोत्सव पूर्ववत सुरु झाला आहे. दिवसेंदिवस येथील स्वयंभू भैरवनाथांची महती सर्वदूर पसरली असून, या यात्रेची व्यापकता देखील मोठी झालेली पहावयास मिळते.

दरम्यान,दोन दिवसांपासून माळण नदीपात्रात पाळणे झुले पालखे खाद्यपदार्थ ची दुकाने,खेळणे विक्रेते आदी दुकानांची रेलचेल सुरू होती यामुळे या यात्रेत लाखोंची उलाढाल झाल्याचे पहावयास मिळाले.
दरम्यान मारवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाने व पोलीस कर्मचारी यांनी दोन दिवस यात्रौत्सवात चोख बंदोबस्त ठेवला. तर मारवड, गोवर्धन, बोरगाव येथील ग्रामस्थांनी यात्रौत्सवासाठी परिश्रम घेत उत्साहात हा यात्रौत्सव पार पडला.

Protected Content