Home धर्म-समाज पाचोऱ्यात काकनबर्डी खंडोबा महाराज यात्रोत्सव रद्द

पाचोऱ्यात काकनबर्डी खंडोबा महाराज यात्रोत्सव रद्द

0
87

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील काकनबर्डी (ओझर) येथे सालाबादप्रमाणे चंपाशष्ठीला खंडेराव महाराज यात्रा साजरी होत असते. मात्र, यंदा ओमायक्रॉन आजराचा प्रादुर्भाव असल्याने यंदाचा यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे.

सालाबादाप्रमाणे काकनबर्डी (ओझर) ता .पाचोरा येथे चंपाशष्ठीला खंडेराव महाराज यात्रा भरत असते. यावर्षी देखील दि. ९ डिसेंबर रोजी यात्रा उत्सव आहे. व सदर यात्रे करीता परीसरातुन तसेच तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात लोक येत असतात. मात्र चालुवर्षी जगभरात तसेच महाराष्ट्रात देखील कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्याने व नवीन ओमायक्रॉन आजाराचा प्रादुर्भाव असल्याने यंदाचा यात्रा उत्वस हा रद्द करण्यात आला आहे. यामुळे कोणीही काकनबर्डी (ओझर) ता. पाचोरा येथे यात्रे करीता येऊ नये व कोणीही दुकाने लावु नये. व कोणीही गर्दी करु नये. असे आवाहन वजा विनंती यात्रा कमिटी, पोलीस प्रशासन, महसुल प्रशासनाद्वारे  करण्यात आली आहे.

 


Protected Content

Play sound