जळगाव प्रतिनिधी । उसनवारीने घेतलेल्या पैश्यांची परतफेड करूनही दोघांकडून मारहाण व शिवीगाळ करत पुन्हा खंडणी मागितल्याने कंटाळून सिंधी कॉलनीतील एका 25 वर्षीय तरूणाने विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अद्यापर्यंत पोलीसांत कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.
याबाबत माहिती अशी की, सिंधी कॉलनीतील 25 वर्षीय तरूणाचे बळीराम पेठे बंजरंगी प्लॉस्टिकचे दुकान आहे. यश सर्वानंद किंगराणी (वय-23) आणि अजय किसनचंद मंधान (वय-28) दोन्ही रा. सिंधी कॉलनीतील रहिवाशी असल्याने दोघांचे तरूणाच्या दुकानावर येणे जाणे होते. तरूणाने व्यवसाय वाढीसाठी दोन लाख रूपये उसनवारीन पाच महिन्यापुर्वी घेतले होते. त्यानंतर बंटीने संपुर्ण रक्कम व्याजासकट परत केली. त्यानंतर पुन्हा दोघांनी शिवीगाळ व मारहाण करून पैश्यांची मागणी करायला सुरूवात केली. त्यानंतर जिवेठार मारण्याची धमकी देखील दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात 28 जुन आणि 2 जुलै रोजी रितसर तक्रार देवूनही कारवाई होत नाही. याला कंटाळून तरूणाने यांने आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास विषारी औषध आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नातेवाईकांनी तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले.