जळगाव प्रतिनिधी । शहरातील सुप्रसिद्ध आर.सी.बाफना ज्वेलर्सच्या जळगाव मुख्यालयातील 80 कॉम्प्युटर अज्ञात व्यक्तीकडून हॅकर्सने हॅक करून 980 डॉलर्स खंडणीची मागणी केल्याची तक्रार शनीपेठ पोलीसात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
शहरातील अग्रगण्या गणले जाणारे आर.सी. बाफना ज्वेलर्सचा महत्वाचा डेटा अज्ञात हॅकर्सने हॅक केला आहे. दरम्यान या प्रकरणी आर.सी. बाफना ज्वेलर्सच्या प्रशासनाने शनीपेठ येथे जावून रितसर तक्रार दाखल केले असून अज्ञात हॅकरच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. या प्रकारामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.