कडकनाथ कोंबडी पालक समितीचा १३ डिसेंबर रोजी मंत्रालयावर धडक मोर्चा (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 12 06 at 3.14.19 PM

जळगाव, प्रतिनिधी | कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्यात नुकसान झालेल्या हजारो शेतकऱ्यांचा शुक्रवार १३ डिसेंबर रोजी मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समिती निमंत्रक कॉ. दिग्विजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मागील चार महिने महाराष्ट्रासह देशातील सहा राज्यांमध्ये व्याप्ती असलेल्या शेकडो कोटींच्या घोटाळ्याबाबत राज्यभर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. शुक्रवार १३ डिसेंबर रोजी मंत्रालयावर कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्यात अडकलेल्या हजारो शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची सुरवात ९ डिसेंबर रोजी बेळगाव मधून मोटरसायकल रॅलीने मोर्चाची सुरुवात होईल, १० रोजी कोल्हापूर, ११ रोजी सातारा, १२ रोजी पुणे तर १३ रोजी हा मोर्चा मंत्रालयवर धडक मोर्चा पोहचणार आहे. कडकनाथ कोंबडी पालनात रोज लाखोंच्या कोंबड्या मरत असतांना मागील गेंड्याच्या कातडीच्या फडणवीस सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला. शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये आरोपीचा साक्षीदार करण्यात आला. यात कोणाचा राजकीय फायदा आहे हे समोर येणे जरूरीचे असल्याचे कॉ. पाटील यांनी सांगितले. नवीन सरकारने शेकऱ्यांच्या मागणीकडे तत्काळ लक्ष देऊन सोडवाव्यात अशी मागणी करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेला कॉ. सुधाकर पाटील, अजीज खान वहाब खानप, दीपक पाटील, स्वामी पाटील, भास्कर माळी, किशोर ताडे, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.

 

Protected Content