Home Cities एरंडोल एरंडोल येथील पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा कबड्डी संघ विजयी

एरंडोल येथील पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा कबड्डी संघ विजयी

0
35


WhatsApp Image 2019 09 22 at 5.12.55 PM

एरंडोल, प्रतिनिधी । येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९  वर्षं वयोगटातील मुलींच्या संघाने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये विजय संपादन केला.

 १८ सप्टेंबर रोजी जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्ष वयोगटातील कबड्डी स्पर्धेत एरंडोल कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने भडगाव संघविरुद्ध ३४/१०  असा एकतर्फी विजय संपादित केला. यावेळी जिल्ह्यातील १५ संघांनी सहभाग नोंदविला होता. विजयी संघाला प्रा.के.जे.वाघ व प्रा.मनोज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी संघाचे संस्था अध्यक्ष अमित पाटील, संचालक संजय पाटील, रायगडे, प्राचार्य डॉ. ए. आर.पाटील,उपप्राचार्य एस. एस. पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.


Protected Content

Play sound