जळगाव, प्रतिनिधी | ज्योतिष शास्त्रात रवी, गुरु, शनी, मंगळ राहू आणि केतू या ग्रहांना अतिशय महत्व असते. हे ग्रह आकाशात अदृश्य असलेल्या बारा राशींमध्ये आपापल्या गतीनुसार सतत भ्रमण करीत असतात. या भ्रमणात हे ग्रह वेळोवेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत जात असतात. त्याला ग्रहांचे राश्यांतर म्हटले जाते. असेच गुरु ग्रहाचे दि.५ नोव्हेंबर २०१९ ला राश्यांतर होत असून गुरु मध्यरात्रीनंतर पहाटेच्या सुमारास वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रात या राश्यांतराला महत्व असून त्याचे शुभ-अशुभ परिणाम वेगवेगळ्या राशींच्या जातकांवर कमी-अधिक तीव्रतेने होत असतात.
गुरूचा बदलाचे सर्वसाधारणपणे मानवी समाजावर ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने काय परिणाम होणार आहेत ? याची माहिती आपण मेडिकल अॅस्ट्रोलॉजीचे गाढे अभ्यासक व सुवर्णपदक विजेते डॉ. शेखर भावे यांच्याकडून जाणून घेणार आहोत.