जळगाव प्रतिनिधी । जुन्या भांडणाचे कारण उकरून काढत विवाहितेसह तिच्या भावाला सहा जणांनी बेदम मारहाण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात सहा जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील म्हसावद येथे राहणारी 21 वर्षीय महिला आज दुपारी 3.30 वाजता दुकानावर जात असतांना जुन्या भांडणाचे कारण काढून संशयित आरोपी शुभम शिवराम धनगर, सागर शिवराम धनगर, अविनाश धनगर, बापू धनगर, भैय्या धनगर, आणि रवि धनगर सर्व रा. इंदिरा नगर, म्हसावद ता.जि.जळगाव यांनी महिलेचे दोन्ही हात पकडून मारहाण केली. यात रवि धनगरने महिलेचे दोन्ही हात पकडले व शुभम धनगरने मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी महिलेने आराडाओरड केल्यानंतर महिलेचा भाऊ गुलाम रसुल तानुमिया पटेल याने जाब विचारला. जाब विचारल्याचा राग येवून वरील सहा जणांनी गुलमाला देखील बेदम मारहाण केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात महिलेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शुभम शिवराम धनगर, सागर शिवराम धनगर, अविनाश धनगर, बापू धनगर, भैय्या धनगर, आणि रवि धनगर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.