फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मागील भांडणाच्या कारणावरून तरूणाला लोंखडी रॉडने मारहाण करून गळ्यातील सोन्याची चैन व रोकड जबरी काढून घेतल्याचा प्रकार समोर आला. याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फैजपूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद अलतमश शेख युसूफ (वय-२८) रा. साळीवाडा, फैजपूर हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. अल्युमिनीअमचे भांडे विक्री करण्याचा व्यवसाय करत असतो. १७ मार्च रोजी फैजपूर शहरात खंडेराव महाराज यांचा यात्रोत्सव सुरू होता. त्यावेळी मोहम्मद अलतमश शेख हा देखील यात्रेत गेला होता. त्यावेळी मागील भांडणाच्या कारणावरून शेख ऐजाज अहमद उर्फ गुड्डू शेख जाकीर व शेख जाकीर शेख करीम दोन्ही रा. ताहनगर फैजपूर यांनी मोहम्मद अलतमश शेख युसूफ याला शिवीगाळ करून लोखंडी रॉडने मारून गंभीर दुखापत केली त्यात हाड देखील फ्रॅक्चर झाले होते. त्याला खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होता. २४ दिवसांच्या उपचारानंतर मंगळवारी १९ एप्रिल रेाजी दुपारी फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी शेख ऐजाज अहमद उर्फ गुड्डू शेख जाकीर व शेख जाकीर शेख करीम दोन्ही रा. ताहनगर फैजपूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मसलुद्दिन शेख करीत आहे.