पाचोरा – नंदू शेलकर | “ईद ए मिलाद नबी” (स. अ.) मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त शहरातील आठवडे बाजार येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
जुलुस – ईद ए मिलाद उन नबी” निमित्त सकाळी १० वाजता भव्य अशा शोभायात्रेस प्रारंभ झाला. डी. जे. च्या गजरात, समाजाचे झेंडे फिरवत तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत आठवडे बाजार, देशमुख वाडी, वल्लभभाई पटेल रोड, नगरपरिषद चौकापासुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जामनेर रोड ते आठवडे बाजारापर्यंत भव्य जुलुस काढण्यात आला. याप्रसंगी आ. किशोर पाटील, वैशाली नरेंद्रसिंह सुर्यवंशी, मा. नगराध्यक्ष संजय गोहील, पी. टी. सी. चेअरमन संजय वाघ, काॅंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी समाज बांधवांना ईद ए मिलाद निमित्त शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ओ. बी. सी. सेलचे इरफान मणियार, मा. नगरसेवक बंडू चौधरी, अजहर खान, अयुब बागवान, रिजवान पठाण, जावेद शेख सह मोठ्या संख्येने तरुण, तरुणी, समाज बांधव, भगिनी या जुलुस मध्ये सहभागी झाले होते.