जुगार खेळणाऱ्या नऊ जणांवर एलसीबीची कारवाई


download 17

जळगाव प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील वराड येथे असलेल्या प्लॉट भागात सार्वजनिक जागी इलेक्टिक लाईट चे उजेडात काही जण झन्ना-मन्ना नावाचा पत्ता जुगाराचा खेळणाऱ्या 9 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्याच्या तब्यातील 1 लाख 68 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली.

याबाबत महिती अशी की, जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांना धरणगाव तालुक्यातील वराड या गावात काही जणा पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती दिली. त्यावरून पो.नि. रोहम यांनी एक पथक तयार करून सोमवारी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास धाड टाकून राजेंद्र भास्कर देशमुख (वय-32), रा.पिपळकोठा,ता.एरंडोल, शेख सळीम शेख हुसेन (वय-40), रा. लहान पाळधी ता.धरणगाव, नगराज भरत पाटील (वय-39) भगवान शंकर जाधव (वय-48) दोघे रा.वराड ता.धरणगाव, शेख सलिम शेख याकुब वय-40, रा.तांबापुरा, जळगाव, दिलीप दगडु पाटील (वय-39) रा.मुसळी ता.धरणगाव, विलास शामराव मराठे, (वय-34) रा.चिचपुरा, ता.धरणगाव, किरण प्रकाश पाटील (वय -35) रा.पिपळकोठा, ता.एरंडोल, बापु उत्तम पाटील (वय-38) रा.मुसळी ता.धरणगाव असे सांगीतल्याने त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेता त्यांचे ताब्यातील 23 हजार 790 रोख रुपये व पत्ता जुगाराची साधनासह 1 लाख 45 हजार किमतीचे 04 मोबाईन फोन व 4 मोटारसायकल असे एकुण 1 लाख 68 हजार 790 रुपये किमतीचा ऐवज स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.

यांनी केली कारवाई
पोलीस उपनिरीक्षक कैलाससिंग पाटील, पोहेकॉ नारायण पाटील, बापु पाटील, योगेश पाटील, किरण चौधरी, मनोज दुसाने, सुशिल पाटील, प्रविण हिवराळे, मुरलीधर बारी यांनी कारवाई केली. नऊ जणांवर बापु पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here