जळगाव प्रतिनिधी । अपर पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी हद्दीत ठिकठिकाणी जुगार अड्ड्यावर धाड टाकून कारवाई करण्यात आल्या. या कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्यांचे ढाबे दणाणले आहे. म्हसावद ते लामंजन रोडवर तीन पत्ती नावाचा हरजित खेळण्याचा अड्डयावर करावाई करण्यात आली. यातील 23 जणांवर कारवाई करत 10 लाख 15 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात 23 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, म्हसावद ते लामंजन या दरम्यान रामकृष्ण पाटील यांच्या शेतातील पोलट्री फार्मवर 20 ते 25 जण जुगार खेळत असल्याची माहिती अपर पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांना मिळाल्यानंतर पथक तयार करून रात्री 11.30 वाजता कारवाई केली.
कारवाई करत अटक केले संशयित आरोपी
अनिल शिवलाल कोळी वय 41, रा. म्हसावद, प्रदिप भाऊराव न्हावी वय 29 रा. नागदुली ता.एरंडोल, समाधान संतोष पाटील वय-38 रा. म्हसावद, संभाजी रमेश पाटील रा. वावडदा, सौरभ विजयकुमार कटारीया वय 29 रा. म्हसावद, सतिश नामदेव चौधरी रा. बोरनार, महेमुद रहिमतुल्ला खाटीक वय 60 रा. नागदुली ता.एरंडोल, शांतीलाल चुनिलाल भोई वय 45 रा. म्हसावद, जितेंद्र विक्रम चौधरी वय 34 रा. म्हसावद, विनोद विक्रम चौधरी वय 40 रा. बोरनार, रविंद्र वामन कोळी वय 28 रा. नागदुली, फिरोज शब्बीर पटेल वय 31 रा. बोरनार, भिकन मुसा खाटीक वय 42 रा. नागदुली ता.एरंडोल, फिरोज मुसा पठाण वय 40 रा. बोरनार ता.एरंडोल, अक्षय विश्वास वाणी वय 23 रा. म्हसावद शेख मेहबुब शेख गनी वय 40 रा. मेहरूण जळगाव, निलेश भिमसिंग पाटील वय 44 रा. पाथरी ता.जळगाव, विनोद रमेश पाटील वय 49 रा. पाथरी, सुरेश शिवलाल सोनवणे वय 30 रा. म्हसावद, समाधान लहू धनगर वय 40 रा. म्हसावद, आनंदा रामकृष्ण मोर वय 42 रा. शिरसोली जळगाव, लक्ष्मण मंगा सोनवणे वय 42 रा. म्हसावद ता. जळगाव, नितीन रामकृष्ण पोरवाल वय 55 रा. म्हसावद.
मुद्देमाल जप्त
1 लाख 96 हजार 210 रूपये रोख, जुगाराची साधने, चेकबुके, 22 मोबाईल हॅण्डसेट, तीन पत्ती खेळतांना चैनीच्या वस्तू यांच्यासह एक महिंद्रा बोलेरो गाडी क्रमांक एमएच 19 वाय 8118, सात मोटार सायकल एमएच 15 सीवाय 7277, एमएच 19 बीआर 3750, एमएच 19 बीई 5392, एमएच 19 डीडी 6706, होडा युनिकॉनी नंबर नाही, एमएच 19 बीएक्स 3531 आणि एमएच 19 एवाय 6345 असे एकूण 10 लाख 15 हजार 410 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जुगार अड्ड्यावर
पोउनि मनोहर जाधव, पोहेका सुनिल पाटील पोहेका किरण धमके, पोहेका राजेंद्र चौधरी, विजय काळे अनिल पाटील रविंद्र मोतीराया, सचिन साळुंखे, पो.कॉ. महेश महाले, इआटी पथकातील जुबेर, नरेंद्र सोनवणे, महेश पवार, गोविंद जाधवर रविंद्र भारंबे यांनी रात्री 11.30 वाजता कारवाई केली.