फैजपूर ता. यावल प्रतिनिधी । अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम व थेट द्वितीय वर्षाला जर प्रवेश मिळाला नसेल किंवा ऐच्छिक महाविद्यालय मिळाले नसेल तर शहरातील जे.टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात वाजवी फीमध्ये नॉन कॅपमधून प्रवेशाची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सविस्तर माहिती अशी की, फैजपूर शहरातील नावाजलेले जे.टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालय हे १९८४ पासून अवितरतपणे अभियांत्रिकीच्या विविध शाखांमध्ये दर्जेदार शिक्षण देत आहे. अनेक विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घ्यायची इच्छा असते. किंवा अभियांत्रिकीच्या प्रथम किंवा थेट द्वितीय वर्षाला प्रवेश मिळतच नाही. जे.टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात अश्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली असून वाजवी फीमध्ये नॉन कॅपच्या माध्यमातून प्रवेश घेता येणार आहे. येथील शिक्षणाचा दर्जा उत्तम असल्यामुळे अनेक तरूण व तरूणींना नामाकिंत कंपन्यांमध्ये चांगल्या नोकऱ्या मिळत आहेत. त्यामुळे कमी खर्चात आपल्याच भागामध्ये असलेल्या या महाविद्यालयात अजूनही ज्यांना प्रवेश मिळाला नसेल त्यांनी संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संचालक मंडळ, प्राचार्य व विभाग प्रमुख यांनी केले आहे.