बुलढाणा, प्रतिनिधी । जिल्ह्यातील दहा दिवसाच्या लॉकडाऊन काळात फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना विविध सुविधा दिल्या जात असतांना पत्रकारांचा त्यात समावेश करण्यात न आल्याने टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशनतर्फे पत्रकारांचा देखील यात समावेश करण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदाद्वारे करण्यात आली असता मागणी मान्य करण्यात आली.
बुलडाणा जिल्हाधिकारी यांच्या मार्फत कोरोना नियमाचे पालन करण्यासाठी काढण्यात येणाऱ्या आदेशामध्ये पत्रकारांचा नामोउल्लेख नसल्याकारणाने फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा पत्रकारांना मिळत नसल्याने यानंतर काढण्यात येणाऱ्या आदेशामध्ये फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा मिळण्यासाठी पत्रकारांचा नामोउल्लेख करण्यासाठी टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशनच्या वतीने आज रविवारी ९ में रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून मागणी करण्यात आली. सदर मागणी जिल्हाधिकारी यांनी मान्य करून १० दिवसाच्या कडक लॉकडाऊनचा काढण्यात आलेल्या आदेशमध्ये पत्रकरांचा नामोउल्लेख केला आहे. यामुळे १० दिवसाच्या कडक लॉकडाऊनमध्ये फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा पत्रकारांना मिळणार आहे…