जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ग. स. सोसायटी निवडणुकीच्या मतमोजणीचे वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकाराची दुचाकी लांबविली.
शहरातील व्यंकटेश नगरातील रहिवासी डॉ. गोपी सोरडे हे पत्रकार आहेत. त्यांच्याकडे (एमएच १९ एयू २५००) क्रमांकाची दुचाकी आहे. दि. ३० रोजी ते ग. स. सोसायटी निवडणुकीच्या मतमोजणीचे वृत्तांकन करण्यासाठी ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गेले होते. त्यांनी आपली दुचाकी विद्यापीठातील सोशल सायन्स विभागाच्या पार्कींगमध्ये लावली होती. वृत्तांकनासाठी गेले असता, अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी लांबविली. त्यांनी दुचाकीचा संपुर्ण विद्यापीठाच्या परिसरात शोध घेतला मात्र ती मिळून न आल्याने त्यांनी पाळधी दूरक्षेत्र पोलिसात तक्रार दिली. त्यांच्यातक्रारीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय चौधरी हे करीत आहेत.