चोपडा प्रतिनिधी । येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड अमृत महाजन यांनी सोशल मीडियात पत्रकारांबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी येथील पत्रकारांनी महसूल व पोलीस प्रशासनाला निवेदन दिले.
याबाबत वृत्त असे की, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड अमृत महाजन यांनी विधानसभेच्या निवडणुकी काळात मीडियाचा सर्वेत भाजपाला जास्त जागा दाखवत असल्याने त्यांचा राग येऊन चोपडा शहर पब्लिक, पत्रकार सृष्टी आणि सर्वधर्म समभाव या तीन व्हाटसअॅप ग्रुपवर पत्रकारांबाबत आक्षेपार्ह मजकूर टाकला होता. यामुळे त्यांनी सर्व मीडिया सहकार्याची बदनामी केली म्हणून तालुक्यातील सर्व पत्रकारांची चोपडा विश्रामगृहाला जेष्ठ पत्रकार अनिलकुमार पालिवाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत अमृत महाजन यांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल होऊन त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणीचा निर्णय घेण्यात आला. तसेच त्यांची एकही बातमी कोणीही छापू नये असा निर्णय घेण्यात आला. महाजन यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा याचे पडसाद राज्यभरात उमटतील असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यानंतर तहसील कचेरीवर मंडल अधिकारी अमृतराव वाघ यांना निवेदन देण्यात आले व सहा.पोलीस निरीक्षक मनोज पवार, सहा.पोलीस निरीक्षक श्री उनवणे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महाजन यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. प्रशासनच्या वतीने अमृतराव वाघ, यांच्या सह सहा.पोलीस निरीक्षक श्री उनवणे आणि मनोज पवार यांनी बोलताना सांगितले की, आपल्या भावनांचा विचार करून आम्ही लवकरच कारवाई करू असे असे आश्वासन दिले. यावेळी तालुक्याभरातून इलेक्ट्रॉनिक, प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते.