पत्रकार गणेश शिंदे राष्ट्रीय समाजगौरव पुरस्कार घोषित

ganesh shinde

 

पाचोरा प्रतिनिधी। येथील अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जळगाव, धुळे, नंदुरबार विभाग प्रमुख गणेश जनार्धन शिंदे यांना अखिल भारतीय प्रतिभा साहित्य संमेलन नवी दिल्लीतर्फे नुकताच ‘राष्ट्रीय समाज गौरव’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

 

यासंदर्भात माहिती अशी की, गणेश शिंदे यांनी लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून पत्रकारितेच्या माध्यमातून शासकीय, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यवसायिक, धार्मीक अशा विविध विषयावरील लेख, वार्तापत्र वर्तमानपत्रातून प्रकाशित करून जनजागृती केली आहे. तसेच विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक दृष्टीकोनातून समाजकार्य केले आहे. शिंदे यांचे पत्रकारिता क्षेत्रात मोठे नावलौकिक आहे. १५ सप्टेंबर रोजी इंडिया गेट आद्र भवन नवी दिल्ली येथे केंद्रीय सामाजिक न्याय भारत सरकार मंत्री ना. रामदास आठवले, राज्यसभा सदस्य पदमश्री.डॉ. विकास महात्मे, भारत सरकार मानव अधिकार आयोग सदस्य ज्ञानेश्वर मुळे, राज्यसभा सदस्य छत्रपती संभाजीराजे भोसले, राज्यसभा सदस्य डॉ. नरेंद जाधव, लोकसभा सदस्य खा.नवनीत रवी राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

Protected Content