चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव विधानसभा मतदार संघासाठी भाजपा, शिवसेना, रिपाई, रयत क्रांती सेना या युतीचे अधिकृत उमेदवार युवा नेते मंगेश चव्हाण यांनी आज आपला उमेदवारी अर्ज प्रचंड शक्तिप्रदर्शन करीत येथील तहसील कार्यालयात प्रांत शशिकांत सातळरकर यांच्याकडे दाखल केला.
मंगेश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज सकाळपासूनच सिताराम पैलवान यांच्या मळ्यातील त्यांच्या पेंडलमध्ये समर्थकांची प्रचंड गर्दी जमली होती. यात महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या मंडपात उपस्थित पक्ष पदाधिकाऱ्यांनी जनसमुदायाला संबोधित केल्यानंतर उघड्या जीपवर संपूर्ण शहरभर मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढून हा उमेदवारी अर्ज भरण्यात आला.
यावेळी भाजपाचे जिल्हाप्रमुख डॉ.संजीव पाटील, माजी खासदार तथा माजी मंत्री एम.के.पाटील, माजी आमदार साहेबराव घोडे, बेलगंगा साखर कारखान्याचे चेअरमन चित्रसेन पाटील, राजेंद्र वाडीलाल राठोड, भाजपा तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, रिपाईचे जिल्हाध्यक्ष आनंद खरात, नगरसेवक राजेंद्र चौधरी, संजय राजपूत, सोमसिंग राजपूत, चंदू तायडे, चिराग शेख, बाप्पू अहिरे, प्रभाकर चौधरी, मानसिंग राजपूत, निलेश राजपूत, नगराध्यक्ष आशालता चव्हाण, पं.स.सभापती स्मितल बोरसे, दिनेश बोरसे, दड पिंपरीचे माजी सरपंच नाना पवार, रोहिणीचे सरपंच अनिल नागरे, जि.प.सदस्य पोपटतात्या भोळे, शेषराव पाटील, भास्कर पाटील, भुषण पाटील, खुशाल पाटील, जितेंद्र वाघ आदींसह पाच हजारांवर समर्थक उपस्थित होते.