मध्य प्रदेश व महाराष्ट्र पोलिसांची संयुक्त बैठक

 

रावेर, प्रतिनिधी । मध्ये प्रदेश मधील बऱ्हाणपूर जिल्ह्यात नेपानगर विधानसभा पोट निवडणूकच्या अनुषंगाने बॉर्डर मिटिंग रावेर पोलीस स्टेशनला आयोजित करण्यात आली होती

रावेर येथे शुक्रवार १८ सप्टेंबर रोजी आयोजित बॉर्डर मीटिंगला बऱ्हाणपूर जिल्ह्यातील निंबोला पोलीस स्टेशनचे प्रभारी एल. एस. लोवनशी, किशोर व सपकाळे उपस्थित होते. तसेच रावेर पोलीस स्टेशनकडून उप विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे व एपीआय शितल कुमार नाईक तसेच पीएसआय मनोज वाघमारे, एएसआय करोडपती, पोलीस कॉन्स्टेबल मंदार पाटील, विजू जावरे, पुरुषोत्तम पाटील आदी उपस्थित होते.

या मिटिंग दरम्यान मध्य प्रदेश व महाराष्ट्र बॉर्डर लागून असलेल्या गावातून होणाऱ्या अवैध प्रकारे होणाऱ्या व्यवहारांना आळा घालण्या संदर्भात बॉर्डर हद्दीत गुन्हेगार व त्यांच्याकडून होणाऱ्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठीच्या उपाय योजनाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली.

Protected Content