पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा कोसळून विटंबना झाल्याची घटना घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ पाचोरा शहरात महाविकास आघाडीच्या वतीने सत्ताधारी सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करत जोरदार घोषणबाजी करण्यात आली.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबना झाल्याच्या निषेधार्थ सत्ताधारींना जोडो मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी कॉग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी या सरकार चे करायचे काय खाली डोळे वर पाय, महायुती सरकार चा निषेध, आदी घोषणा देण्यात आल्या.
आंदोलनात यांचा सहभाग
आंदोलनात कॉग्रेस तालुका ध्यक्ष सचिन सोमवंशी, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष प्रदीप पाटील, कॉग्रेस जिल्हा सरचिटणीस प्रताप पाटील, इरफान मनियार, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष इस्माईल तांबोळी, शिवसेना उबाठा चे उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, माजी उपजिल्हा प्रमुख अॅड अभय पाटील, तालुकाप्रमुख शरद पाटील, माजी शहरप्रमुख भरत खंडेलवाल, शहर प्रमुख अनिल सावंत,अरुण तांबे, ज्ञानेश्वर चौधरी, युवा सेना उपजिल्हाप्रमुख संदीप जैन पप्पू राजपूत, उपशहर प्रमुख अभिषेक खंडेलवाल, युवा सेना तालुका प्रमुख शशी पाटील, अरुण तांबे, युवा सेना शहरप्रमुख मनोज चौधरी, उपशहर प्रमुख गजानन सावंत, उपशहर प्रमुख पप्पू जाधव, खंडू सोनवणे, बंडू मोरे, ज्ञानेश्वर चौधरी, नामदेव चौधरी, गजू पाटील, प्रशांत पाटील, हरिभाऊ पाटील, राकेश सोनवणे, बबलू भोई, संतोष पाटील, श्री. गांगुर्डे धर्मराज पाटील, राजू गायकवाड,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष विकास पाटील, विधानसभा प्रमुख नितीन तावडे, शहर अध्यक्ष अजहर खान आदी उपस्थित होते यावेळी नायब तहसीलदार श्री कुमावत यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनाच्या वेळी सत्ताधारींच्या विरोधात आक्रोश दिसुन आला