जळगाव प्रतिनिधी । न्यू जागृती मित्र मंडळ संचलित जिजामाता माध्यमिक विद्यालयात आज दि. 10 ऑगस्ट रोजी रोटरी क्लब जळगाव 7बाय7बाय7 अंतर्गत व्याख्यानमालेत योगा विषयावर प्रमुख वक्ते रो.डॉ.काजल फिरके यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खोरखेडे यांनी डॉ.काजल फिरके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांनी जीवनातील योगाचे महत्व, योगा केल्याने शरीर निरोगी, प्रसन्न राहते व योगाचे विविध आसने व त्यांचा फायदा, योग्य ते स्वीकार करा, जीवनात नाही बोलायला शिका, योग्य आहार व दिनचर्या कशी असावी अशा अनेक विविध विषयांवर सविस्तर हसत-खेळत वातावरणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी लता इखनकर, किशोर पाटील, आशा पाटील, संगीता पाटील, कृष्णा महाले, दिनेश सोनवणे, विकास तायडे, शैलाजा चौधरी आदी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी जगदीश शिंपी उपस्थितीत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय खैरनार यांनी केले.