जामनेर प्रतिनिधी । येथील ज्ञानगंगा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला विद्यालयाचे प्राचार्य आर. जे.सोनवणे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यावेळी डॉ. बाबासाहेब यांच्या विचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा दिला. त्यांनी केलेल्या संविधान याबाबत माहिती देण्यात आली. या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.