जळगाव, प्रतिनिधी | स्थायी समितीच्या १६ सदस्यांपैकी ज्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे अशा ८ सदस्यांचा आज ईश्वर चिट्ठी टाकून निवृत्त करण्यात आले. यात स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांचाही समवेश आहे.
ईश्वर चिठ्ठी काढण्यासाठी चौबे शाळेतील इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी निशा नितीन राजपूत, इयत्ता पाचवी काजल सुनील कोळी, इयत्ता सहावी दुर्गेश भारत पाटील, निलेश सुनील कोळी यांच्या हस्ते काढण्यात आल्या. याप्रसंगी स्थायी सभापती जितेंद्र मराठे, आरोग्य उपायुक्त मिनीनाथ दंडवते, महसूल उपायुक्त उत्कर्ष गुटे, आस्थापना उपायुक्त अजित मुठे, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. निवृत्त झालेले सभासद यात भारतीय जनता पार्टीचे ५ सदस्य, २ शिवसेना, १ एम.आय.एम. सदस्याची ईश्वर चिट्ठीत नाव निघाल्यने त्यांना निवृत्त करण्यात आले. निवृत्त सदस्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे सुरेश माणिक सोनवणे, प्रतिभा सुधीर पाटील, उज्वला बेंडाळे, जितेंद्र मराठे, मयूर कापसे यांचा समावेश आहे. तर शिवसेनेचे नितीन लढ्ढ, नितीन बरडे व एम.आय. एम.चे बागवान रियाज अहमद अब्दुल करीम यांच्या नावाची चिट्ठी निघाल्याने हे सर्व ८ सदस्य १ ऑक्टोबर २०१९ रोजी निवृत्त होतील. सभासद निवृत्तीपद्धतीत पारदर्शकता हा हेतू ठेऊन ईश्वर चिट्ठीची संकल्पना स्थायी सभापती जितेंद्र मराठे यांनी मांडली होती. यानुसार एक पारदर्शक बॉक्समध्ये सर्वच्या सर्व १८ सदस्यांच्या नावाची चिट्ठी टाकण्यात आल्यात. यानंतर बॉक्स मधून चौबे शाळेतील विद्यार्थ्यांनी एक एक करून ८ चिठ्ठ्या काढल्या. दरम्यान, स्थायी समितीच्या रिक्त ८ सदस्यांची नावे महासभेत निश्चित करण्यात येतील. त्यानंतर १६ सदस्यांचा प्रस्ताव तयार केला जाईल. तो प्रस्ताव विभागीय आयुक्ताकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर विभागीय आयुक्त सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर करतील.
सदस्यत्व कायम राहिलेले सदस्य
भगतराम बालाणी, सदाशिव ढेकळे, अॅड. शुचिता हाडा, दिलीप पोकळे, प्रवीण कोल्हे, सुनील खडके चेतन सनकत, विष्णू भंगाळे या ८ सदस्यांचे पुढील १ वर्षासाठी स्थायी सभासदत्व कायम राहिले आहे.