Home Cities जळगाव जितेंद्र मराठे यांच्या पुढाकाराने जलपुनर्भरण मोहीम

जितेंद्र मराठे यांच्या पुढाकाराने जलपुनर्भरण मोहीम

0
31

जळगाव प्रतिनिधी । स्थायी समितीचे सभापती जितेंद्र मराठे यांच्या पुढाकाराने जल पुनर्भरण मोहीम राबविण्यात येत असून गोलाणी मार्केटपासून याला प्रारंभ करण्यात आला.

स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांनी गेल्या महिन्यात शहरातील सामाजिक संस्थांशी चर्चा करून रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचा निर्णय घेतला होता. या उपक्रमाला जल फाउंडेशन या संस्थेने प्रतिसाद दिला आहे. या संस्थेच्या माध्यमातून गोलाणी मार्केटजवळ जेसीबीने खड्डा खोदण्यास सुरुवात झाली. ६ बाय ६ आकाराचा व ८ फूट खोल असे तीन खड्डे खोदण्यात येणार आहे. यामुळे मार्केटमधील वाया जाणारे पाणी जमीनीत जिरवण्यात येणार आहे. याप्रसंगी जितेंद्र मराठे यांच्यासह राहुल पवार, हिरेश कदम, संजय भावसार, विजय मराठे, ज्ञानेश्‍वर पाटील, हेमंत पाटील, रवींद्र महाले, अभिजित महाजन, मृदुल अहिरराव , प्रशांत बाविस्कर आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound