पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील एन.इ.एस. गर्ल्स विद्यालयातील सातवीत शिकणारी विदयार्थिनी तनुष्का विजय बागडे हीची तालुका स्तरिय विज्ञान प्रदर्शनात प्रथम येऊन जिल्हास्तरावर पात्र ठरली आहे.
जि.प. सदस्य हर्षल माने, रोहन सतिष पाटील, गट शिक्षणाधिकारी कविता सुर्वे, विस्तार अधिकारी सी.एम. चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या विज्ञान प्रदर्शनात तिने मल्टीपर्पज अलार्म मॉडेल सादर केले होते. पंपाद्वारे पाण्याची टाकी भरुन झाल्यावर अतिरिक्त पाणी वाया जाऊ नये, यासाठी अलार्मचा ध्वनी ऐकू ऐताच आपण पंप बंद करु शकतो. यामुळे पाण्याची व विजेची बचत होऊ शकते. या प्रकल्पासाठी शाळेच्या उपशिक्षिका रूपाली कोठावदे यांचे तिला मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन वसंतराव मोरे व सर्व संचालक मंडळासह, शाळेच्या मुख्याध्यापिका नंदिनी मोराणकर व सर्व शिक्षकवृदांनी तनुष्काचे अभिनंदन व कौतुक केले.