जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठी आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली.
याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (महसूल) रविन्द्र भारदे, जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागातील कर्मचारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंचायत समितीनिहाय सभापती पदाची आरक्षणनिहाय सोडत जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांच्या अध्यक्षतेखाली एका लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठया काढून जाहीर करण्यात आले.
पंचायत समिती निहाय आरक्षण
बोदवड- अनुसूचित जाती (एससी), जामनेर-अनुसूचित जमाती (एसटी), पाचोरा-अनुसूचित जमाती (एसटी) महिलासाठी राखीव, पारोळा-अनुसूचित जमाती (एसटी) महिलासाठी राखीव, जळगाव-नागरिकांचा मागास प्रवर्ग, चाळीसगाव-नागरिकांचा मागास प्रवर्ग, यावल-नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), भडगाव-नागरिकांचा मागास प्रवर्ग, भुसावळ-सर्वसाधारण (महिला), चोपडा-सर्वसाधारण (महिला), अमळनेर- सर्वसाधारण (महिला), एरंडोल-सर्वसाधारण (महिला), रावेर-सर्वसाधारण, धरणगाव-सर्वसाधारण, मुक्ताईनगर-सर्वसाधाण.
अशाप्रकारे जिल्ह्यातील एकूण 15 पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठी अनुसूचित जाती (एससी)-01, अनुसूचित जमाती (एसटी)-03 पैकी 02 महिलांसाठी, नागरिकांचा मागास प्रवर्ग-04 पैकी महिलांसाठी 02, सर्वसाधारणासाठी 07 यापैकी महिलांसाठी 04.याप्रमाणे आरक्षित झाले आहेत.