जळगाव प्रतिनिधी । आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीत इच्छुकांची भाऊगर्दी झाली. आज रविवारी कोअर कमीटीसमोर जिल्हाभरातील तब्बल 164 उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. राज्याचे ऊर्जा व पर्यटन राज्यमंत्री मदन येरावर यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या.
राज्यभरात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. जिल्ह्यातही गेल्या महिन्याभरापासून विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत, भाजपामध्ये बाहेरून अनेकांची प्रवेश सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप कोअर कमिटीची बैठक आज बालाजी लॉन येथे घेण्यात आली. ना. मदन येरावर यांच्यासह माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, आमदार हरीभाऊ जावळे, खा. उमेश पाटील, संघटनमंत्री किशोर काळकर, जिल्हाध्यक्ष संजीव पाटील, आमदार चंदूलाल पटेल, आमदार स्मिताताई वाघ आदी उपस्थित होते.
चाळीसगाव तालुक्यासाठी 35 उमेदवार इच्छुक; पत्रकारांना प्रवेश नाकारला
प्रदेश भाजपकडून आलेले नामदार येरावर यांच्यासोबत आधी कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला पालकमंत्री गिरीश महाजन वगळता जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित होते. त्यानंतर कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार एकनाथराव खडसे व ना.येरावार यांनी मार्गदर्शन केले.देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राबवण्यात येणाऱ्या योजना याविषयी येरावार यांनी मार्गदर्शन केले.दुपारी तीन वाजेनंतर विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती सुरू झाल्या. रात्री उशिरापर्यंत या मुलाखती सुरू होत्या. दिवसभरात झालेल्या बैठका किंवा मुलाखतींना पत्रकारांनाही प्रवेश देण्यात आलेला नव्हता. चाळीसगावातून सर्वाधिक 35 इच्छुक भाजपाचे तिकीट मिळावे यासाठी मुलाखत देण्याकरिता चाळीसगावतून सर्वाधिक 35 उमेदवार इच्छुक होते.
इच्छुकांमध्ये यांनी दिल्या मुलाखती
मंगेश चव्हाण, डॉ विनोद कोतकर, संपदाताई पाटील, चित्रसेनदादा पाटील, डॉ.संजीव पाटील, पोपटतात्या भोळे, राजेंद्रअण्णा, सुरेश स्वार, किशोर पाटील धोमणेकर, अविनाश सूर्यवंशी वाघळी, किशोर पाटील करजगाव, संभाजीराजे पाटील सायगाव, समाधान पाटील,धर्मा आबा वाघ दहिवद, सतिष दराडे, उद्धवराव महाजन, उत्तमराव महाजन, संजय भास्कर पाटील यांचा समावेश होता.